मावळ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहरगावं येथील कुलस्वामिनी आई एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळ लोकसभा MSRDC च्या माध्यमातून ४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. या बाबत आज आधिकाऱ्यां समवेत मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी एकवीरा देवी पायथा मंदिर परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना विकास आराखडाच्या सादर करण्याच्या सूचना दिल्या.
आई एकवीरा देवी मंदिर विकास आराखडा बनवत असताना स्थानिक नागरिकांना ग्रामपंचायत विविध पक्ष व संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्या योग्य सूचनांचा विचार करूनच विकास आराखडा बनवावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या समवेत मा. राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे जिल्हा वनसंरक्षक आधिकारी श्री.राहुलजी पाटील ,MSRDC च्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती अश्विनी घोडके,श्री.सतीश स्रावगे ,तहसीलदार मधुसूदन बर्गे मावळ अतिरिक्त पोलीस अधिकारी श्री कर्तिकजी मावळ शिरोता व लोणावळा खंडळा विभागचे मुख्य वनपाल व भा.ज.पा.तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,तालुका प्रमुख राजेश खांडभोर आर पी आय अध्यक्ष लक्षमण भालेराव उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे,भाजप चे जितेंद्र बोत्रे उपनगरअध्यक्ष कम्मूभाऊ पुजारी मुख्य अधिकारी लोणावळा नगरपरिषद श्री पंडित पाटील आशिषभाऊ बुटाला जिल्हा संघटक अंकुश देशमुख,पिपंरी चिंचवड शहर प्रमुख निलेशभाऊ तरस सुनिलभाऊ हगवणे राजेंद्रजी तरस युवा सेना उपप्रमुख ,दत्ताभाऊ केदारीयुवा सेना प्रमुख मावळ, विशाल हुलावळे,मा.जी प सदस्य मिलींद बोत्रे महिला आघाडी भाजपच्या अध्यक्ष सायलीताई बोत्रे स्थानिक वेहरगावं सरपंच व उपसरपंच व सदस्य ग्रामस्थ टपरी संघटना मनसेचे अशोक कुटे मोरेश्वर पडवळ मा सरपंच दत्ता पडवळ सतीश पडवळ नितीन देशमुख तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!