पुणे पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटी निवडणूकीत संघर्ष पॅनेलचा दणदणीत विजय

906 0

   विरोधी उत्कर्ष पॅनेलचे पॅनेल प्रमुख व इतर उमेदवारांचे मागासवर्गीय गटातून डिपॉजिट जप्त 

पुणे : पुणे पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटी पंचवार्षिक निवडणूक 2023-2028 कॉम्रेड नागेशकुमार नलावडे, कॉम्रेड दिपक धुमाळ, कॉम्रेड दिलीप जगदाळे, कॉम्रेड अरविंद शिवतरे,कॉम्रेड उमाकांत वालगुडे यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष पॅनेलने 21 पैकी 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवत 22 वर्षांपासून असलेली सत्ता कायम राखली.

विरोधात असणाऱ्या उत्कर्ष पॅनेलच्या 2 उमेदवाराचे आणी पॅनेल प्रमुखांची अनुसूचित जाती जमाती प्रवार्गातून अनामत रक्कम जप्त झाली. निवडणूकीपूर्वीच संघर्ष पॅनेल 11 जागा बिनविरोध जिंकल्यामुळे सदर निवडणूक 10 जागेसाठी लढली गेली.

Share This News
error: Content is protected !!