#CRIME : शेळ्या चरायला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कुटुंबीयांना कळले तेव्हा होती सात महिन्यांची गर्भवती; औरंगाबाद येथील धक्कादायक घटना

641 0

औरंगाबाद हर्सूल : शेळ्या चरायला नेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला कोणालाही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस वीस वर्ष सप्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंडापैकी 20 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी राहुल मगरे या आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने औरंगाबाद मधील हर्सूल पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानुसार पीडित मुलगी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जात असायची तर सायंकाळी परत येत होती. दरम्यान आरोपी राहुल मगरे हा देखील बकऱ्या करण्यासाठी सोबत घेऊन जात होता. राहुल मगरे याने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीतेने बकऱ्या चरण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सुरुवात केली. पण त्या ठिकाणी पुन्हा येऊन आरोपीने पीडितेवर बलात्कार केला होता.

त्यानंतर पिडीतेच्या मावशीकडे दुसऱ्या गावी गेले असता, तिच्या बहिणीला तिचा पोटाचा वाढलेला आकार पाहून संशय आला. त्यावरून वैद्यकीय तपासणी केली असता, पिडीता ही सात महिन्यांची गरोदर असल्याचं धक्कादायक सत्य कुटुंबाच्या समोर आलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

Share This News
error: Content is protected !!