चीन : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनच्या लोकसंख्येत 2022 मध्ये 8 लाख 50 हजार एवढी घट झाली आहे. 1961 नंतर पहिल्यांदाच लोकसंख्येत घट झाली असल्याचं चीनने जाहीर केलं आहे. 2022 च्या अखेरीला चीनची लोकसंख्या 1.41 अब्ज होती.
2022 मध्ये चीनमध्ये 95.6 लाख बाळांचा जन्म झाला तर मृतांची संख्या 1.041 नोंदवली गेली. चीन केवळ चीनच्या मुख्य भूमीवरील लोकसंख्या मोजतो आणि हॉंगकॉंग व मकाऊ या देशांना तसच परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकानां त्यातून वगळतो.
लोकसंख्येच्या घसरणीला आळा घालण्यासाठी चीनने अनेक मोठी पावलं उचलली आहेत. 2016 मध्ये त्यांनी 35 वर्षांपासून लागू असलेल ‘एक मूल धोरण’ शिथिल केलं. 2021 मध्ये मुलांना जन्माला घालण्याची मर्यादा वाढवून तीन करण्यात आली.तेव्हापासून लहान कुटुंबांनाही अधिक मुलं होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनकडे पाहिलं जातं. मात्र ब्लूमबर्गने वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या अंदाजाचा हवाला देत म्हंटल आहे की भारतान लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलंय.
- वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू ही जनगणनेवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र संस्था आहे.
- या संस्थेच्या अंदाजानुसार 2022 च्या अखेरीस भारताची लोकसंख्या 1.417 बिलियन म्हणजे 141 कोटींहून अधिक होती.
- ही संख्या चीनने सादर केलेल्या अहवालापेक्षा 50 मिलियनने जास्त आहे.
चीनच्या लोकसंख्येमध्ये झालेली घट संपूर्ण जगावर परिणाम करू शकते. चीनमध्ये तरुणांची उणीव जाणवेल असं तज्ज्ञांच मत आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याचा धोका आहे.