पुण्यात नायलॉन मांजामुळे 2 पोलीस कर्मचारी जखमी; मोठी दुर्घटना टळली

421 0

पुणे : मकर संक्रांतीचा सण जसजसा जवळ येत जातो तसा नायलॉन मांजाचा वापर करू नका, हे नियमबाह्य असून देखील दरवर्षी अशा अनेक घटना घडतच असतात. पुण्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी नायलॉन मांजामुळे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्यांचा गळा तर सोबत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा हात चिरला असल्याची घटना घडली आहे. नायलॉन मांजामुळे ही दुर्घटना घडली. या मध्ये दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!