PUNE CRIME : ‘तुझा माज उतरवतो…!’ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला ; लोहियानगरमधील घटना

1115 0

पुणे : सध्या पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत असताना लोहियानगरच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर शनिवारी रात्री रिक्षाचालकावर चार रेकॉर्डवरील आरोपींनी रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार केले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भावाला मारहाण का केली ? तुझा माज उतरवतो, असे म्हणून फिर्यादी रिक्षा चालकावर शनिवारी रात्री अजय बॅगरी, शैलेश बॅगरी, अनिकेत कोळी आणि भरत कोळी या चौघांनी हल्ला केला. हे चौघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या प्रकरणी प्रेम अनिल पाटोळे यांनी खडक पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे.

या चौघांनी कोयत्याने फिर्यादी यांच्या हातावर आणि डोक्यावर वार केला आहे. तसेच लाकडी बांबूने देखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!