Crime

पिंपरीत गावगुंडांचा हैदोस; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

1480 0

पिंपरीतील कॅम्प परिसरात गावगुंडांच्या दहशतीचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आलाय. पिंपरी कॅम्प परिसरातील एका दुकानाची तोडफोड करून गावगुंडांनी दुकानमालक आणि कामगारांवर हल्ला केला. काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपरी कॅम्प परिसरातील जय बाबा मार्केटमधील सिमरन बॅग हाऊस या रेडिमेड कपडे आणि बॅगच्या दुकानात गावगुंडांच्या टोळक्यानं हप्ता मागण्यासाठी दगड आणि चामडी बेल्टच्या साह्यानं दुकानाची तोडफोड केली आणि त्यानंतर दुकानमालक आणि कामगारांवर हल्ला केला. या घटनेमुळं पिंपरी-चिंचवड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दुकानमालकाच्या तक्रारीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात शुभम यादव, गोलू आणि इतर तीन गावगुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Share This News
error: Content is protected !!