मेष रास : आज स्वतःच्या मनाला वेळ देणार आहात अर्थात मनशांती मिळवण्यासाठी ध्यानधारणा कराल सायंकाळी मित्रांना भेटायचा मूड होईल आउटडोर गेम खेळायला बाहेर पडाल मनसोक्त जगाल आरोग्य साथ देणार आहे.
वृषभ रास : घरात असो किंवा बाहेर तुम्हाला छान दिसणं आणि तसं राहणं खूप आवडतं तुमच्या या स्वभावामुळे आज तुमच्या कोणीतरी प्रेमात पडणार आहे अर्थात कुणीतरी तुमचं कौतुक करणार आहे वातावरणामधला गारवा वाढतो आहे तब्येत चांगली असली तरी दुर्लक्ष मात्र करू नका
मिथुन रास : बऱ्याच दिवसापासून तब्येतीच्या कुरबुरी जाणवत आहेत वातावरणातील बदल शरीराला सहन होत नाहीयेत पण आज आराम मिळणार आहे कुटुंबाचे सहकार्य मिळेल कार्यालयीन कामकाज पूर्ण होतील
कर्क रास : कोणाकडूनही मदतीची अपेक्षा करू नका युद्ध तुम्हालाच लढायचे आहे जिंकणार आहे तुम्हीच आहात आणि फायद्याचा उपभोग देखील फक्त तुम्ही घेणार आहात तब्येत साथ देणार नाही पण मन कणखर असेल
सिंह रास : आज जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात भूतकाळातल्या काही गोष्टी त्रास सुद्धा देऊ शकतील पण आज मन सकारात्मक असल्यामुळे घडलेल्या वाईट घटनांमधील तुमची चूक काय होती हे तुम्ही आज एक्सेप्ट कराल त्यामुळे मन हलके होईल
कन्या रास : खर्चावर नियंत्रण ठेवा पैशांचा संचय करा सकारात्मक कार्यासाठी लवकरच पैसा लागणार आहे अर्थात उच्च शिक्षण प्रॉपर्टी खरेदी करणार आहात दिवस चांगले आहेत पण काटेकोर वागा उधळपट्टी करू नका
तुळ रास : दिवस सर्वोत्तम आहेत आयुष्याचा आनंद लुटा मित्र-मैत्रिणींशी बोला कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला जा पैसे खर्च करा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दृष्ट्या दिवस उत्तम लग्न ठरू शकते
वृश्चिक रास : परिस्थिती नियंत्रणात आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या टापटीप राहणे तुम्हाला आवडते पण मरगळ सोडा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल
धनु रास : आज विशेष व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची इच्छा होईल अर्थात ही विशेष व्यक्ती तुमची गोड फादर असेल किंवा तुमच्या गुरुस्थानी असेल आयुष्यातल्या चढउतारांवर मार्गदर्शन घेण्याची इच्छा होईल सर्व काही नियंत्रणात आहे पण कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला हे सांगावं अशी तुमची इच्छा होईल
मकर रास : कणखर स्वभाव असला तरी तुमचा आळस तुम्हाला मागे खेचतो आहे आज आळस झटका फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन स्वतःकडे लक्ष द्या नोकरीच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी होणार आहात विवाह इच्छुकांचे विवाह ठरणार आहेत
कुंभ रास : वेळापत्रक सध्या खूप व्यस्त सुरू आहे पण त्यातूनही वेळ काढा स्वतःसाठी कुटुंबासाठी काहीतरी विशेष करण्याची इच्छा होईल आर्थिक स्थिती चांगली आहे मनमौजी कारभार करणार आहात वातावरणाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो स्वतःची काळजी घ्या
मीन रास : मीन राशीसाठी आजचा दिवस यादगार राहणारा दिवस आहे आज पैसा खर्च कराल मजा मस्ती आवडत्या माणसासोबत वेळ घालवाल आरोग्य उत्तम राहणार आहे आर्थिक स्थिती चांगली आहे कुटुंबाचे पुरेपूर सहकार्य मिळेल.