मोठी बातमी : पुणे रेल्वे स्टेशनला निनावी फोन; रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, वाचा सविस्तर

634 0

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. रेल्वे स्टेशनला एक निनावी फोन आला. या अज्ञात इसमाने फोन करून रेल्वे स्टेशनला बॉम्ब न उडून देण्याची धमकी दिली आहे. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस अलर्ट झाले असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हा निनावी फोन आल्यानंतर पुणे पोलिस तपास यंत्रणांनी हा फोन कुठून आला होता याची तपासणी सुरू केली. दरम्यान हा फोन मनमाड परिसरातून करण्यात आला होता. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला रवाना झालं असल्याचं देखील समजते आहे.

सध्या रेल्वे स्थानकावरील परिस्थिती ही नियंत्रणात असून सामान्य आहे. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉग स्कॉड, बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांनी ही सतर्क राहण्याचा आवाहन यावेळी करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!