सुधीर तांबे यांनी काँग्रेसला फसवलं ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे परखड भाष्य म्हणाले, काँग्रेस सत्यजितला पाठिंबा देणार नाही…

704 0

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. तर माघार घेऊन त्यांनी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी दाखल केली.

दरम्यान यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही. तर भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजप भय दाखवून घर फोडण्याचं काम करत आहेत. भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे. पण ज्या दिवशी भाजपचे घर फुटेल त्या दिवशी त्यांना घर फोडण्याच दुःख काय असतं ते समजेल असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!