इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सना मोठी संधी : 2023 आर्थिक वर्ष संपेपर्यंत 50 हजार फ्रेशर्सना करणार रुजू; वाचा काय म्हणाले इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निरंजन रॉय

768 0

पुणे : जगभरात एकीकडे कोरोनामुळे अनेकांनी आपले नोकरी व्यवसाय गमावले. त्यानंतर आता मंदीचं सावट असताना देखील इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये फ्रेशर्सना मोठी संधी मिळते आहे. इन्फोसिस कंपनीने तिसऱ्या तिमाहीमध्ये सहा हजार फ्रेशर्स ना कामावर रुजू करून घेतलं होतं. तर आता 2023 या आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी पन्नास हजार फ्रेशर्स ना कामावर रुजू करून घेणार आहे.

इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोसिस यावर्षीचे अनुअल प्रोजेक्शन पूर्ण करेलच. परंतु फ्रेशर्स ना रुजू करण्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू ठेवणार आहोत. 2023 हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत आमचे 50 हजार फ्रेशर्सना रुजू करण्याचे ध्येय आहे. तसेच त्यांनी सांगितले की, नव्याने रुजू झालेले प्रेशर्स हे सध्या म्हैसूर मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे फ्रेशर्स कंपनीला पुढे घेऊन जातील हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही असं समजतो आहे की ही एक प्रकारची भविष्यासाठी गुंतवणूक आहे. असं निरंजन रॉय यांनी म्हटलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!