मोठी बातमी : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्यजित तांबे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार

667 0

नाशिक : आज सकाळपर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे सुधीर तांबे असतील अशी स्पष्ट चिन्ह दिसत असताना आता विधान परिषद पदवीधर नाशिक मतदार संघातून विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या ऐवजी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजित तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.

अधिक वाचा : AMOL MITKARI : “बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे…!”

दरम्यान काही दिवसांपासून सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा होती. पण आता काँग्रेसने विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदार संघातून सत्यजित तांबे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप आता कुणाला उमेदवारी देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!