AMOL MITKARI : “बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे…!”

756 0

अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काल सकाळी रस्ते अपघात झाला. त्यांना सध्या नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. वेळेत उपचार मिळाल्यानंतर आता बच्चू कडू यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान , बच्चू कडू यांच्या या अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या शंकेने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडून हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का ? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!