Breaking News

PUNE CRIME : कोयता गॅंगच्या बंदोबस्तासाठी आता ‘स्पेशल स्कॉड’ ; दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – पोलीस महासंचालक रजनीश शेठ

578 0

पुणे : पुणे शहरात काही दिवसापासून कोयता गॅंगने आपली दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालून कोयता गॅंग पुण्याचे वातावरण ढवळून काढत आहेत. शहरात कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या या कोयता गॅंगचा आता बंदोबस्त करण्यासाठी स्पेशल स्कॉडची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.

शहरात कोयता गॅंग मधील गुंडांकडून गर्दीच्या ठिकाणी कोयते हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवण्याच्या घटना घडत आहेत. या प्रश्नासंदर्भात पोलीस महासंचालक रजनी शेट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, कोयता गॅंग बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दखल घेतली असून दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र पोलीस दल सक्षम आहे.

2022 हे पोलीस दलासाठी चांगले गेले राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. नक्षल विरोधी कारवाई मध्येही गडचिरोली आणि गोंदिया भागात पोलीस दलाची कामगिरी उत्तम आहे. पोलीस उपाधीक्षक बदल्या लवकरच होणार असून त्याबाबत गृह विभागाकडून कारवाही सुरू आहे. असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!