KIRIT SOMAYYA : “हसन मुश्रीफांचं काउंटडाऊन सुरू, त्यानंतर अनिल परब आणि अस्लम शेख यांचा नंबर लागणार…!”

512 0

कोल्हापुर : कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणात कारखान्यातील 98% पैसा हा मनी लॉन्ड्रींच्या माध्यमातून जमवण्यात आला असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला असून या घोटाळ्यामध्ये मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचा देखील सहभाग असल्याचं भाजप नेते किरीट समय्या यांनी म्हटल आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, हसन मुश्रीफांचं काउंटडाऊन सुरू, त्यानंतर अनिल परब आणि अस्लम शेख यांचा नंबर लागणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. “ठाकरे यांच्या माफिया सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीची कारवाई सुरू झाली. 158 कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या, मुलाच्या आणि जावयाच्या कंपनीच्या नावानं घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या अनेक बोगस कंपन्यांमधून स्वतःच्या कुटुंबीयांच्या कंपनीत घेतले. त्यानंतर ते पैसे सर सेनापती घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर केले.”

Share This News
error: Content is protected !!