पिंपरी : पिंपरीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून रिक्षा चालक आणि संतापून प्रवाशाला थेट दगडाने मारहाण केली आहे. 24 डिसेंबरला कासारवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली, या प्रकरणी मिटू यादव वय वर्ष 23 याने सोमवारी भोसरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ऑटो रिक्षाने पुणे स्टेशनला जात असताना भाड्याचे पैसे देण्याच्या वादातून शब्दाला शब्द वाढत गेला. आणि या भांडणातून रिक्षा चालकाने संतापून प्रवाशाला थेट दगडाने मारहाण केली आहे. भोसरी पोलीस पथक अधिक तपास करत आहेत.