पुणे : वारजेत सहा दुचाकींना आग VIDEO

451 0

पुणे : मंगळवारी दुपारी ०३•४४ वाजता रामनगर, वारजे पोलिस चौकीलगत दुचाकी वाहनांना आग लागल्याची घटना घडली होती. आगीची वर्दि मिळताच वारजे अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच मोकळ्या मैदानात सहा दुचाकींना आग लागल्याचे पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग त्वरित विझवली असून आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. सदर घटनेत कोणीही जखमी नाही.

सदर कामगिरीत वाहनचालक गौरव बाठे तसेच जवान राजेंद्र पायगुडे, जयेश लबडे, निलेश तागुंदे, अतुल नागवडे, गोविंद केंद्रे यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!