मोठी बातमी : बंगळुरूत मेट्रोचा पिलर कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी अंत; वडील आणि चिमुकली गंभीर जखमी

727 0

बंगळुरू : बंगळुरूमधील नागवारात अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या मेट्रोपिलर अचानक कोसळल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबातील आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये पती आणि मुलगी देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर बंगळुरू मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेज आणि ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अंजुम परवेज यांनी मेट्रो तर्फे या कुटुंबाला वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच या घटनेची चौकशी सुरू आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असे देखील त्यांनी म्हटले आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एचबीआर लेआउट लगत आऊटर रिंग रोडवर सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास हा अपघात घडला. या परिसरात नम्मा मेट्रोस्थानकाचे कामकाज सुरू आहे. घटना घडते वेळी टीएमटी सळ्यांचा वापर करून पिलर बांधण्यात येत होता. हा पिलर अचानक जवळून जाणाऱ्या एका दुचाकीवर कोसळला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!