सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; आज न्यायालयात काय घडले ? वाचा सविस्तर

306 0

नवी दिल्ली : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचे प्रकरण अद्याप देखील प्रलंबित आहे. या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होती. आजच्या युक्तीवादानंतर या प्रकरणावरील सुनावणी हे आता पुढच्या महिन्यात 14 फेब्रुवारीला होणार आहे.

सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि त्यानंतर अनेक आमदार आणि खासदार यांनी शिंदेंचा हात धरून उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासूनच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे गट सत्ता संघर्ष सुनावणी सुरू आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात ही सुनावणी आज पार पडली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य खंडपीठांसमोर आजची सुनावणी पार पडली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल यांनी युक्तिवाद सुरू केला. युक्तिवादा दरम्यान सिब्बल यांनी मागच्या सुनावणी वेळी करण्यात आलेल्या युक्तीवादाचा दाखला दिला आहे.

मागच्या सुनावणी दरम्यान आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरण्यावर अशी विनंती केली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचं जाहीर केल आहे.

Share This News
error: Content is protected !!