98 वर्षीय कैद्याची तुरुंगातून सुटका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “नेमका काय गुन्हा केला होता ?”

755 0

अयोध्या : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला कारागृहातून मुक्त करण्यात येते आहे, असे दिसून येते आहे. सुरत यांना उत्तर प्रदेशच्या आयोध्या कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. पाच वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांना कारागृहातून बाहेर आणतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतो आहे.

राम सुरत यांना सुटका झाल्यानंतर कोणीही घ्यायला आलं नव्हतं. अयोध्येचे अधीक्षक जिल्हा कारागृह शशिकांत मिश्रा पुत्रवत यांना त्यांच्या घरी सोडायला गेले आहेत. असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिल आहे.

राम सुरत यांना कलम 452, 323 आणि 352 आयपीसी अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना निरोप देतानाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यानंतर अनेक निटकऱ्यांनी त्यांनी नेमकी नेमका काय गुन्हा केला होता ,यासाठी त्यांना एवढी शिक्षा देण्यात आली अशा कमेंट केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!