केरळात थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ऑनलाईन मागविलेल्या चिकन बिर्यानीने तरुणीचा घेतला जीव; कुटुंबियांवर उपचार सुरु

494 0

केरळ : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ऑनलाईन मागविलेल्या चिकन बिर्यानीने केरळातील कासारागोड येथील थलकलयी गावातील एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंजूश्री पार्वती (20 ) हीने अल रोमानसिया रेस्ट्रोरंटमधून थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी चिकन ऑनलाईन बिर्यानी मागवली होती. हे अन्न खाल्ल्यानंतर तिच्या घरातील पाच सदस्यांना अस्वस्थ वाटू लागले. सात दिवसानंतर अंजूश्री हीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. तिची आई अंबिका, भाऊ श्रीकुमार ( 18 ), तिच्या 19 वर्षीय कझीन्स श्रीनंदना, अनुश्री यांना उलट्या आणि पोटदुखी सुरू झाली होती.

अंजुश्री हीची आई अंबिका आणि भाऊ यांच्या अजूनही पोटात दुखत असून तिचे इतर नातलग यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू अंजूश्रीला खूप उलट्या झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, केरळाच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!