https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/04/fk9m2hro_sanjay-raut-pti_625x300_15_February_22.jpg

संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ! किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांचा संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला, वाचा काय आहे प्रकरण

326 0

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला कोर्टात दाखल केला होता. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी आता शिवडी कोर्टात पुढची सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.

मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला केला होता. संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून आता मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केलाय. राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारी प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाही. त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला देण्यात यावे अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा जेलवारी घडवणार असं विधान केलं होतं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!