मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कादिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात 700 जणांना विषबाधा

315 0

संभाजीनगर : संभाजीनगरमधून ( औरंगाबाद ) एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कादिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कबीर मौलाना यांच्या मुलाचा लग्न सोहळा 4 जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यामध्ये पाहुण्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यानंतर परिसरातील एमजीएम आणि घाटी रुग्णालयात या पाहुण्यांना दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी जेवणातून विषबाधा झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

लग्न सोहळ्यामध्ये जी मेजवानी देण्यात आली होती, यामध्ये एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतरच या पाहुण्यांना उलटी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नात उपस्थित ज्या पाहुण्यांनी जेवण केले होते, त्यांनाच मोठ्या प्रमाणावर हा त्रास जाणू लागल्यामुळे या जेवणातूनच विषबाधा झाली असल्याचं डॉक्टरांनी म्हटल आहे.

Share This News
error: Content is protected !!