पुणे : फुरसुंगीतून एक विचित्र घटना समोर आली आहे. व्हाट्सअप ग्रुप मधून रिमूव्ह केल्याचा राग आला म्हणून थेट ग्रुप ॲडमिनची जीभ कापण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगीतील ओम साई सोसायटीमध्ये 28 डिसेंबरला रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश पोकळे, सुयोग शिंदे, अनिल म्हस्के, शिवराज पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या सविस्तरमाहिती नुसार, फिर्यादी प्रीती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. सोसायटीत राहणाऱ्या सभासदांनी मिळून सोसायटीचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपचे ॲडमिन फिर्यादी यांचे पती किरण हरपळे हे आहेत. सोसायटीच्या ग्रुप मध्ये सुरेश पोकळे हे वारंवार अश्लील मेसेज टाकत असल्याने ग्रुप ॲडमिन हरपळे यांनी पोकळे यांना ओम हाइट्स ऑपरेशन या ग्रुप मधून काढून टाकलं होतं.
याप्रकरणी मेसेज आणि फोन करून आरोपीने त्रास दिला ! आणि भेटण्यासाठी बोलावून घेतले असता, पोकळे आणि त्याच्या मित्रांनी किरण हरपळे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांची जीभ कापली आहे. अधिक तपास सुरू आहे.