शैक्षणिक बातमी : यूजीसीच्या ‘नेट’ परीक्षेच्या तारखा जाहीर

334 0

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता ऑनलाइन चाचणी अर्थात युजीसी नेट 2023 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

यूजीसीकडून ‘नेट’ परीक्षा जून आणि डिसेंबरमध्ये घेतल्या जातात. डिसेंबर 2022 ची नेट परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत होणार आहे. तर 2023 ची पहिली नेट 13 ते 22 जूनदरम्यान होईल. देशातील विविध विद्यापीठांमध्ये ‘सहायक प्राध्यापक’, ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’, ‘असिस्टंट प्रोफेसर’ या पदांसाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. 180 मिनिटांच्या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. पहिला प्रश्नपत्रिकेत 50 आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 100 बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ केलं जात नाही.

इच्छुक विद्यार्थ्यांनी ugcnet. nta. nic. in या युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी 2023 पर्यंत आहे. सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1100 रुपये शुल्क, ओबीसी उमेदवारांना 550, तर मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 275 रुपये शुल्क भरावे लागेल असं एनटीए द्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!