धक्कादायक बातमी : बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ

875 0

पुणे : पुण्यात नवीन वर्षाची सुरुवातच धक्कादायक अपराधांनी घडते आहे. पिंपरी चिंचवड मधून देखील एक धक्कादायक वृत्त समोर येते आहे. 31 डिसेंबरच्या दुपारी काळेवाडी परिसरातील वकील बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. शिवशंकर शिंदे हे उच्च न्यायालयात वकिली करत होते. त्यांच्या पत्नीने अपहरणाची तक्रार वाकड पोलीस स्थानकात दिली होती.

दरम्यान बेपत्ता झालेल्या या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवरील मदनपूर येथे आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलीस शोध घेत असतानाच ही माहिती मिळाली.

दरम्यान 31 डिसेंबरच्या दुपारी शिवशंकर शिंदे हे कार्यालयातून बेपत्ता झाले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्यांच्या कार्यालयातून तुटलेली बटणे आणि रक्त देखील आढळून आले आहे. त्यामुळे घातपाताचा संशय पोलिसांना होताच. दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास करत आहे.

Share This News
error: Content is protected !!