SPORTS : राज्यभरात आठ ठिकाणी रंगणार ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’

3064 4

SPORTS : आजपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 2 ते 12 जानेवारी या कालावधीत राज्यभरात 8 ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 10, 456 खेळाडू सहभागी होणार आहेत. तब्बल 23 वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या वतीनं कोणताही गाजावाजा न करता राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. 

पुण्यात 22 क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत. त्यात अँथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पेन्टॅथलॉन, शूटिंग, रग्बी, वॉटरपोलो, टेबलटेनिस, ट्रायथलॉन, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वु-शू, ट्रॅक सायकलिंग, सॉफ्ट टेनिस, बॉक्सिंग, रोलर स्केटिंग, रोइंग, स्क्वॅश या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तर कब्बडी स्पर्धा बारामतीमध्ये होणार आहे. नाशिकमध्ये योगासने, सायकलिंग, रोड रेस हे क्रीडा प्रकार होणार आहेत. नागपूरमध्ये बॅडमिंटन, हॅन्डबॉल, नेटबॉल, सेपक टकरा तर जळगावमध्ये खो खो, मल्लखांब, सॉफ्टबॉल, शूटिंगबॉल, या स्पर्धा होणार आहेत. औरंगाबादमध्ये तलवारबाजी, अमरावतीत तिरंदाजी, मुंबईत बास्केटबॉल आणि सांगलीत कॅनोइंग आणि कयानिंग स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकारच्या क्रीडा संघटनेमार्फत त्या त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्तम आठ संघांची आणि खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

आजपासून पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात कुस्तीच्या लढतींनी या स्पर्धला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन 5 जानेवारीला पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!