कृरतेचा कळस : जन्मदात्यानचं दोन दिवसाच्या लेकराला जमिनीवर फेकलं, नागपुरातील धक्कादायक घटना !

495 0

नागपूर : नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होते आहे. या बापाच्या मानगुटीवर बसलेल्या संशयाच्या भूतान आपल्या पोटाच्या दोन दिवसाच्या लेकीला मोठी जखम दिली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हा नराधम बाप हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण आपल्या पत्नीची किंवा नवजात लेकराची विचारपूस करणे ऐवजी त्याने थेट भांडणाला सुरुवात केली आणि अवघ्या दोन दिवसाच्या बाळाला संतापाच्या भरात फरशीवर फेकले.

ही घटना प्रचंड संताप जनक आहे. या घटनेतील आरोपी बाप गिरीश हा अमरावती जिल्ह्यातील सावर्डी येथील रहिवासी आहे. गिरीश गोंडाने आणि प्रतीक्षा गोंडणे या दोघांनी प्रेमविवाह केला होता. पण सुखी संसाराला संशयाच्या भूतान घेरलं होतं. गिरीश सातत्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होऊ लागलं. प्रतीक्षाने सर्व काही निमुटपणे सहन देखील केलं पण, प्रतीक्षाला दिवस गेल्यानंतर ती अमरावतीहून नागपूरला बाळंतपणासाठी आली होती.

31 डिसेंबरला प्रतीक्षाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्या दिवशी सायंकाळी गिरीश नागपूरच्या त्या रुग्णालयात गेला पण, आपल्या नवजात बाळाला डोळे भरून पाहणे ऐवजी त्याने थेट पत्नीशी भांडणाला सुरुवात केली. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्याने थेट बाळाला उचललं आणि फरशीवर आपटलं.

या चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. याप्रकरणी आरोपी बापाविरुद्ध नागपुरातील अजनी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!