Breaking News

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

640 0

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब कालही आरक्षण विरोधी होते आजही आरक्षण विरोधी आहे आणि उद्या सुद्धा आरक्षण विरोधी राहतील. आरक्षणच संपलं पाहिजे, रद्द झालं पाहिजे पण सुप्रियाताई सुळे ह्या धनगर समाजाच्या जीवावर निवडून येतात… मात्र धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळू द्यायचं नाही हीच पवार साहेबांची भूमिका असावी.

कदाचित हा आरएसएसचा कट शरद पवार साहेबांनी मान्य केला असावा. 45 मराठा बांधवांनी मराठा समाजासाठी स्वतःचे प्राण दिले, ते हुतात्मा झाले… हे पवार साहेबांना दिसत नाही का…? पवार साहेबांची भूमिका निषेधार्य आहे. मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पवार साहेबांच्या या वक्तव्याचा अत्यंत तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!