Breaking News

ACB TRAP : 3 लाखाच्या लाचेची मागणी; 2 लाखाचे सेटलमेंट; पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

496 0

पिंपरी : पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस (वय वर्षे 3१) तीन लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली. पिंपरी पोलीस स्थानकामध्ये तक्रारदारदाराच्या भावाच्या विरुद्ध दाखल तक्रारीमध्ये आरोपी न करण्याच्या मागणी साठी ३ लाखाची मागणी पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस यांनी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस स्थानकामध्ये दाखल एका तक्रार अर्जामध्ये तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश डोळस यांनी सुरुवातीला तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड अंतिम दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन डिसेंबर रोजी पडताळणी केली. यामध्ये रोहित डोळस यांनी लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!