Breaking News

पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा

331 0

पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे. शहरात ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री सुमारे 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर तैनात असणार आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध रेस्टॉरंट आणि खासगी रिसॉर्टमध्ये अनेकांनी पार्टी आणि सेलिब्रेशनच
नियोजन केलं आहे. शहरात पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात कारवाई करण्यात येणार असल्यानं वाहनचालकांना शुद्धीतच वाहन चालवाव लागणार आहे. याशिवाय 31 डिसेंबरच्या रात्री दहानंतर डेक्कन परिसरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, आणि जंगली महाराज रस्ता तसेच कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या ठिकाणी गर्दी उसळते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी नियोजन केलं असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री विविध भागांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांना आक्षेपार्ह घटना अथवा काही संशय असल्यास 26126296 किंवा 8975953100 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!