काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, “आजी आणि आईसारखे गुण असणारी जीवनसाथी हवी…!”

299 0

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आजपर्यंत अनेक विषयांमुळे ट्रोल झाले आहेत. राजकीय विषयांच्या व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रश्नांवर अनेक जण त्यांना प्रतिप्रश्न करत असतात. असाच विषय आहे त्यांच्या लग्नाचा…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पर्यंत लग्न केलेले नाही. यावर एका यूट्यूब चैनलने मुलाखत घेताना त्यांना सवाल केला यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “माझी आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्यासारखे गुण अंगी असलेली व्यक्ती जीवनसाथी म्हणून मी निवडेल…!

आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान एका युट्युबरने त्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा प्रथमच राहुल गांधी यांनी आपल्या लग्नावर भाष्य केला आहे.

Share This News
error: Content is protected !!