महत्वाची माहिती : नवीन वर्षामध्ये बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे याची लिस्ट आता आरबीआयने जाहीर केली आहे. तर मग नवीन वर्षामध्ये तुमचं जर बँकेचे महत्त्वाचे काम असेल, तर या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. कारण वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये बँकेला एकूण 14 सुट्ट्या असणार आहेत.
जानेवारी महिन्यामध्ये येणारे सण साप्ताहिक सुट्टी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी यामुळे जानेवारीमध्ये एकूण 14 सुट्ट्या बँकेला असणार आहेत.
यामध्ये एक जानेवारीला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. 2 जानेवारीला मिझोराममध्ये नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे बँक बंद राहील. 11 जानेवारीला मिशनरी डेनिमित्त मिझोराम मध्ये सर्व बँका बंद राहतील. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल. 14 जानेवारीला महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 15 जानेवारीला रविवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील. तर 16 जानेवारीला ऊझावर थिरुणाली निमित्त पांडिचेरी आणि तमिळनाडूमध्ये तर कानोमा पांडूगा निमित्त आंध्र प्रदेश मध्ये बँका बंद राहणार आहेत. 22 जानेवारीला रविवार आहे. 23 जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील. 25 जानेवारीला हिमाचल प्रदेशमध्ये किंग शिप डेनिमित्त बँकांना सुट्टी असेल. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. 28 जानेवारीला महिन्याच्या चौथ्या शनिवारची सुट्टी आहे. 29 जानेवारीला रविवार आहे. तर 31 जानेवारीला मी-द-मी फीच्या दिवशी आसाममध्ये बँका बंद राहणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरबीआय कडून जारी करण्यात आलेल्या या सुट्ट्या राष्ट्रीय पातळीवरील आहेत. यातील काही सुट्ट्या या स्थानिक तर काही प्रादेशिक पातळीवरील असल्याकारणामुळे संबंधित राज्यांमध्येच बँकांना सुट्टी असणार आहे.