CRIME NEWS : श्रद्धा वालकर हत्याकांड्यानंतर देश अक्षरशः हादरला आहे. श्रद्धाची देखील गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतून निर्दयीपणे तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. पुन्हा एकदा अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधील आजमगड जिल्ह्यात घडली आहे.
उसाच्या शेतामध्ये एका तरुणीचे सहा तुकडे केलेले शरीर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेतली असता तो मृतदेह उत्तर प्रदेश मधील इसहाकपूर येथील केदार प्रजापती यांची मुलगी आराधना तिचा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, असता तिच्या प्रियकरापर्यंत तपास पोहोचला. आणि एक धक्कादायक हत्याकांड पुन्हा एकदा जगासमोर आले.
आराधनाचा प्रियकर प्रिन्स यादव यानेच आराधनाचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिथे सहा तुकडे करून उसाच्या शेतात फेकून दिले होते. काही दिवसांपूर्वी आराधनाचा विवाह एका दुसऱ्या व्यक्तीसोबत करून दिला होता. याच गोष्टीचा राग आल्याने प्रिन्स यादव यांनी हे भयावह हत्याकांड रचले.
धक्कादायक म्हणजे या हत्येमध्ये प्रिन्स यादव याचे आई-वडील, मामा मामी, मामाचा मुलगा आणि त्याच्या पत्नीने ही मदत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता पाच महिलांसह आठ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.