पुणे कॅम्पमध्ये अनाथ आश्रमात आगीची घटना; 100 मुलांची सुखरुप सुटका VIDEO

329 0

पुणे : काल मध्यराञी १२•४१ वाजता (दिनांक २७•१२•२०२२) २४१०, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, तय्यबीया मुलांचे अनाथ आश्रम, पुणे येथे आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी तय्यबीया अनाथ मुलांचे आश्रम (ट्रस्ट) या चार मजली असणारया इमारतीत तळमजल्यावर आग लागल्याचे पाहून मोठ्या प्रमाणात धुर झाल्याचे निदर्शनास येताच जवानांनी तातडीने इमारतीत असणाऱ्या जवळपास १०० मुलांना (वय ०६ ते १६ वर्षे) आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवून मोठा धोका दूर केला व त्याचवेळी आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या १० मिनिटात आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.

या आगीमधे इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचे व इतर काही साहित्याचे नुकसान झाले आहे. आग मध्यम स्वरुपाची असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असे समजले.

या कामगिरीत पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते, तांडेल – चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल – आसिफ शेख, वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप, पंकज रसाळ यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!