अनिल देशमुख यांना हायकोर्टाचा दिलासा; जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची याचीका फेटाळली; कारागृहातून सुटका केव्हा ? वाचा सविस्तर

377 0

मुंबई : अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने जामिनाच्या स्थगितीची याचिका दाखल केली होती. आज सीबीआयची हे याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची आता कारागृहातून उद्या सुटका होणार आहे.

अधिक वाचा : “सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ताकदीनिशी उभे राहणार !” विधानसभेत ठराव एकमताने मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपते आहे. सीबीआयने याच जामिनाला स्थगिती देण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. या संदर्भात आज हाय कोर्टामध्ये तातडीची सुनावणी करण्यात आली , त्यामुळे आता अनिल देशमुख यांची 28 डिसेंबर रोजी कारागृहातून सुटका होते आहे.

अधिक वाचा : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ; मुलीच्या टीईटी घोटाळा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यासह काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या. यामध्ये तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही आणि आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागेल या अटी घालण्यात आल्या होत्या. त्यासह तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश देखील आणि देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide