बांधकाम परवाने देणारी BPMS वेबसाईट ६ दिवसांपासून बंद

383 0

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानगीसाठी महाआयटीने तयार केलेली बीपीएमएस (BPMS) ही ऑनलाइन सिस्टीम गेल्या सहा दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे राज्यभरातील बांधकाम परवानग्या रखडल्या असून एकट्या औरंगाबाद महापालिकेत सहा दिवसात 50 हून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती मिळते आहे.

यापूर्वी बांधकाम परवानगी ही ऑफलाइन पद्धतीने दिली जात होती. मात्र नागरिकांना सहज सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी बीपीएमएस ही वेबसाईट नगर विकास विभागाने एक एप्रिल 2022 पासून सुरू केली होती.

दरम्यान ही वेबसाईट सहा दिवसांपासून बंद आहे. वेबसाईटमध्ये काही त्रुटी येऊ लागल्यानंतर साईट मधील त्रुटी दूर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र या त्रुटी दूर झाल्या नसून 21 डिसेंबर पासून बीपीएमएस साईटच बंद पडली आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून ही साईट बंद पडल्या कारणाने अनेक बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!