पुणे : पश्चिम शहराचा पाणी गुरुवारी बंद; शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

276 0

पुणे : गुरुवार दि. 29 डिसेंबरला वारजे जलकेंद्राच्या हद्दीतील गांधी भवन टाकी आणि चांदणी चौक टाकीतून पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिन्यांना फ्लो मीटर बसवायचे असल्याने या दिवशी संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचनगंगा, अलकनंदा शिवप्रभा मंत्री पार्क 1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रथमेश सोसायटी, डी. पी. रोडवरील भाग

बावधन
बावधन गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसायटी, विद्यानगर, पाषाण रोडवरील डावा, उजवा भाग, शुक्रवारी 30 डिसेंबरला या परिसरात सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!