Breaking News

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वासोटा किल्ल्यावर जाण्याचा विचार करत आहात ? तर वनविभागाचा ‘हा’ निर्णय वाचा

313 0

सातारा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण काहीतरी विशेष प्लॅन करत असणार, पण तुम्ही जर सातार्यातील वासोटा किल्ल्यावर जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा विचार करत आहात, तर ही बातमी पूर्ण वाचा कारण वासोटा किल्ल्यावर 30 डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वनविभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक वासोटा किल्ल्यावर येऊन जे पर्यटक केवळ धिंगाणा करतात, त्यांचा त्रास जंगली प्राण्यांना होतो. यासाठीच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 30 डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान वासोटा किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

वासोटा हा सह्याद्री पर्वतरांगांमधील सातारा- रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर असणारा किल्ला आहे. जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग संपन्न गाभा क्षेत्रात शिवसागर जलाशयाच्या पलीकडे वासोटा किल्ला आहे.

Share This News
error: Content is protected !!