Breaking News

राज ठाकरेंचा पुणे दौरा; मनसेच्या गोटात तणाव; ‘त्या’ पत्रानंतर राज ठाकरे यांची कशी असणार भूमिका…

328 0

पुणे : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक सणसणीत पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. अर्थात नक्की हे पत्र कुणासाठी होतं ? हे जरी त्या पत्रामध्ये उल्लेखल गेलं नव्हतं तरीही कदाचित तो नेम वसंत मोरे यांच्या दिशेने असावा या चर्चेला उधळण आले होते. परंतु त्यानंतर स्वतः वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अधिक वाचा : ‘ही 101 टक्के आत्महत्या नसून हत्या !’ सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नवा खुलासा VIDEO

राज ठाकरे अनेक दिवसांपासून मनसेमध्ये नाराज आहेत. आता स्वतः राज ठाकरे आजपासून पुढचे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांची भूमिका काय असेल या तीन दिवसांमध्ये काय हालचाली होतील वसंत मोरे यांची नाराजी दूर होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे.

काय लिहिले होते राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र ,

सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.

माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरड ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या ! मग काय घाण करायची आहे ती करा…

पक्षात राहून असे प्रकार केलेत तर हकालपट्टी अटळ आहे.  हे लक्षात ठेवा ही समज नाही तर अंतिम टाकीत आहे याची नोंद घ्या असं जगदंब राज ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे भरला होता.

Share This News
error: Content is protected !!