कोरोना परत येतोय ! रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे ‘हे’ पदार्थ आहारात घ्याच

401 0

सध्या कोरोनाने जपान, चीन आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये थैमान घातल आहे. भारतामध्ये देखील काही प्रमाणात कोरोना अजूनही आहेच. आणि पुन्हा एकदा जगावरील संकट वाढते असताना भारत सरकारने देखील हळूहळू निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा शरीराला बळकट करण्यासाठी या पदार्थांचे सेवन आहार मध्ये सुरू करा.

१. पालक : हिरव्या पालेभाज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी देखील मदत मिळते. पालकांमध्ये विटामिन सी, झिंक वॉलेट आणि अँटिऑक्सिडंट शरीराला बळकटी देतात.

२. अंडी : अंड्यांमध्ये जीवनसत्व ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड आणि खनिजे असतात ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आणि कोरोनाचे सावट पाहता अंड्यांचे नियमित सेवन करा.

३. सुकामेवा : ड्रायफ्रूटचा नेहमीच शरीराला चांगला फायदा होत असतो. ड्रायफ्रूट्समध्ये प्रथिने जीवनसत्व अँटिऑक्सिडंट आणि मोठ्या प्रमाणावर खनिजे असतात. ज्यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुकामेव्याचे सेवन कराच.

४. लिंबू : मोसंबी, पेरू, आवळा सारखी सी विटामिन युक्त फळे : सी विटामिन शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर वाढते नंतर सी विटामिन च्या गोळ्या घेण्यापेक्षा आतापासूनच सी विटामिन युक्त फळांचे सेवन करण्यास सुरुवात करा.

५. हळद : रोज हळदीचे दूध प्यायला विसरू नका यामध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी इन्फोमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप प्रभावी आहेत त्या सह सर्दी परशा सारखे आजार देखील दूर होतील.

Share This News
error: Content is protected !!