Special Report : सावधान ! सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग कराल तर सेक्सटॉर्शनचे व्हाल शिकार

303 0

अनोळखी मेसेजेस, व्हिडिओ कॉल येत असतील तर सावधान… तुम्ही सेक्सटॉर्शनचे शिकार होऊ शकता. हल्ली तरुण-तरुणींपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या मायाजालात अडकत आहेत. मध्यंतरी पुण्यात दोन तरुणांनी सेक्सटॉर्शनला कंटाळून आत्महत्या केली. सेक्सटॉर्शनच हे जाळं वाढतच चाललंय. सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय आणि या जाळ्यात अडकण्यापासून वाचायचं असेल तर काय करायचं… पाहा Top News मराठीचा हा special report… सेक्सटॉर्शनचं मायाजाल…

सेक्सटॉर्शन म्हणजे हनी ट्रॅप. वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणांचं हुकुमी हत्यार म्हणून हनी ट्रॅप जगभर प्रसिद्ध आहे पण हल्ली हनी ट्रॅपचा ट्रेंड बदलत आहे.

सेक्सटॉर्शनची सुरुवात साधारणपणे सामान्य दिसणाऱ्या स्त्रीकडून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्टने होते. आपणही उत्सुकतेने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो आणि मग चॅटिंग सुरू होते. काही काळानंतर संभाषण अधिक खाजगी होते. नंबर दिला जातो व्हॉट्सअपवर बोलणं सुरू होतं आणि गोष्टी वेगाने घडू लागतात. काही दिवसांनी व्हिडिओ कॉल येतो. खऱ्या महिलेचा फक्त फोटो दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू असतो तर महिलेचा मागचा कॅमेरा चालू असतो त्यावर पॉर्न व्हिडिओ चालवले जातात पण टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू असल्याने त्याला अलगद अडकवल जातं. काही वेळाने फोन वाजतो. व्हिडीओ चॅटिंगची रेकॉर्ड केलेली क्लिप पाठवली जाते. आणि त्याच वेळी पैसे पाठवले नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.

याला फक्त पुरुषच बळी पडतात, असं नाही तर अनेकदा महिलांनाही फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी मेसेज किंवा व्हिडिओ कॉल येतात आणि त्याही बळी पडतात.

सेक्सटॉर्शनमध्ये अडकल्याने अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं सातत्याने घडत आहेत. सेक्सटॉर्शनपासून वाचायचं असेल तर सोशल मीडिया, ऑनलाइन डेटिंग ॲपवर अनोळखी व्यक्तीशी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आपली वैयक्तिक माहिती कुणालाही पाठवू नका. त्यातूनही असा प्रकार घडला तर वेळीच पोलिसांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. अनोळखी मेसेज आला तर ‘बुलाती है मगर जाने का नही’ हे कायम लक्षात ठेवा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!