पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेटली; तब्येतीची केली विचारपूस VIDEO
पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सायंकाळी रुबी हॉल क्लिनिक मध्ये जाऊन भेट घेतली. तसेच उदयनराजे भोसले हे देखील रुग्णालयात दाखल झाले आहेत.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई देसाई यांनी आ. जयकुमार गोरे यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. ते म्हणले कि, “जयकुमार गोरे लवकरच अतिदक्षता विभागातून बाहेर येतील. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. तसेच हा घातपात असल्याची शक्यता वाटत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान उदयनराजे भोसले देखील आ. जयकुमार गोरे यांची विचारपूस करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले आहेत.
