Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज काळा दिवस; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

335 0

Stock Market : या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम राहिल्याने गुंतवणूकदार आक्षशरशः रडकुंडीला आले आहेत. गुंतवणूकदारांच्या चौफेर विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 60 हजार अंकांखाली आला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18 हजार अंकांखाली घसरला आहे.

आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 980 अंकांच्या घसरणीसह 59,845 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 320 अंकांच्या घसरणीसह 17,806 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे एकाच दिवसात 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला. गुरुवारी बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, बीएसईवरील लिस्टेड कंपनीचा मार्केट कॅप 280.53 लाख कोटी रुपये होता. शुक्रवारी बाजारात झालेल्या घसरणीमुळे मार्केट कॅप 272.37 लाख कोटी इतका झाला.

तर बँकिंग सेक्टरमध्ये 1.75 टक्क्यांची घसरण दिसून आली. ऑटो सेक्टरमध्ये 2.54 टक्के, आयटी सेक्टरमध्ये 1.83 टक्के, पीएसयू बँकेच्या सेक्टरमध्ये 6.06 टक्के, एफएमसीजीमध्ये 1.71 टक्के, मेटल्समध्ये 4.47 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. एनर्जीस सेक्टरमध्ये 4.86 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

निफ्टी 50 मधील फक्त तीन कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. यामध्ये सिप्लामध्ये 0.24 टक्के, डिवीज् लॅबमध्ये 0.22 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!