“…म्हणून आज दिवसभर सभागृहात गोंधळ घालण्यात आला…!” संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका,वाचा काय म्हणाले संजय राऊत…!

401 0

नवी दिल्ली : आज दिवसभरात पाच वेळा हिवाळी अधिवेशनामध्ये व्यत्यय आला. आज पाच वेळा सभा तहकूब करावी लागली. हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता.

दरम्यान दिशा सालियन यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी राहुल शेवाळे यांनी केलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप एसआयटी भूखंड घोटाळ्याच्या बाबत सुरू असलेल्या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घनाघाती आरोप केले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असती म्हणून आज दिवसभरात दोन्हीही सभागृहात गोंधळ घालण्यात आला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राहुल शेवाळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल उपस्थित करून संजय राऊत म्हणाले की, “राहुल शेवाळे यांनी कारण नसताना एक मुद्दा उपस्थित केला कारण नसताना ते घसरले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाली विधानसभेत देखील हा विषय चर्चिला गेला असे यावेळी ते म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!