ROHIT PAWAR : “जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी सत्ताधारी आमदार पायऱ्यांवर आंदोलन करतात; हेच का जनसामान्यांचे भरकटलेलं दिशाहीन सरकार ? रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

354 0

नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. या खडाजंगीमध्ये अनेक वेळा सभा तहकूब करावी लागली.

विधिमंडळात गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा स्थगित करावे लागले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहेत.

हेच का जनसामान्यांचे भरकटलेलं दिशाहीन सरकार सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जायचीच ही त्यांची तयारी दिसते. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!