पतंजली योगपिठाशी संबंधित जगभरातून सुरू असलेल्या झूम मीटिंगमध्ये सुरू झाला पॉर्न व्हिडिओ आणि… ! पुण्यातील त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

583 0

हरिद्वार : इंटरनेटने जगाला खूप जवळ आणल आहे. त्यात कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम यावर भर दिला जातो आहे. पण या काळामध्ये आपण अनेक किस्से ऐकले असतील की घरूनच स्टडी म्हणा, ऑफिसचे काम किंवा एखाद्या समूहाची महत्त्वाची मीटिंग म्हणा.. झूम कॉल सुरू असताना त्यावर चित्रविचित्र प्रकार घडल्याचं आपण ऐकलं असेल. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

पतंजली योगपिठाची संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये संपूर्ण जगभरातुन अनेक जणांनी सहभाग घेतला होता. पण अचानक बैठक सुरू असताना त्यावर पॉर्न व्हिडिओ सुरू झाला, आणि एकच गदारोळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एका पुण्यातील तरुणानं हा प्रताप केला आहे. बैठक सुरू असताना त्याने हा पॉर्न व्हिडिओ सुरू केला.

हे या तरुणांना मुद्दामहून गेलं की चुकून झालं याविषयी तपास सुरू आहे. याप्रकरणी आता पतंजलीकडून पुण्याच्या येरवडा येथील कॉलेज कॅम्पसमध्ये राहणाऱ्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!