कामाला लागा ! पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करा; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

312 0

पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मार्च महिन्यात निवडणूका लागतील त्या दृष्टीने कामाला लागा. तसेच पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करा असा आदेश या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. लवकरच पक्षाच्या घे भरारी या अभियानाचे वेळापत्रक जाहीर होईल आणि घे भरारी हे अभियान १००% यशस्वी व्हायला पाहिजे त्या दृष्टीने तयारी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Share This News
error: Content is protected !!