छात्रभारतीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल कांबळे तर, सचिवपदी संपदा डेंगळे यांची निवड

621 0

पुणे : आज ता. 18 डिसेंबर रोजी छात्रभारतीची बैठक आयोजित केली होती. या वेळी 39 वे वर्धापन दिन साजरा करण्यात आले. तसेच, माजी कार्यकर्त्यांनी त्यांचा छात्रभारतीचा प्रवास सांगितला व निराश न होऊन सातत्याने काम करण्याचा सल्ला दिला. या वेळी पुणे जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.

राष्ट्र सेवा दलाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष दिपाली आपटे, संजय गायकवाड, शिवराज सूर्यवंशी, प्रकाश कदम, छात्रभारती राज्य सदस्य तुकाराम डोईफोडे, जिल्हाध्यक्ष छाया काविरे या वेळी उपस्थित होते.

खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी- प्रफुल कांबळे
सचिव- संपदा डेंगळे
संघटक- सौरव शिंपी
संघटिका- दिव्या कांबळे
उपजिल्हाध्यक्ष- अक्षय राऊत
संपर्क प्रमुख- जुगल माकम
सदस्य- वैष्णवी कोळी

Share This News
error: Content is protected !!