RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकहो…! इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका; वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

630 0

मेष रास : आज तुमचा वेळ इतरांवर टीका करण्यात घालवू नका. यामुळे लोक तुमच्याबद्दल केवळ नकारात्मक विचार करतील. चांगले संबंध वाईट होऊ शकतात. आरोग्यासाठी दिवस चांगला.

वृषभ रास : आज तुम्ही तुमचे मन चिंतनामध्ये व्यस्त ठेवाल. मनःशांतीसाठी आज प्रयत्न कराल. लोकांचे बोलणे मनावर घेणे टाळा. कर्ज आज घेऊ नका.

मिथुन रास : आज तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या. कार्यालयीन किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. भविष्यासाठी बी प्लॅन तयार कराल.

कर्क रास : अनावश्यक ताणतणाव यामुळे तुमचा दिवस अधिक विचार करण्यातच जाईल. येणारा दिवस जाणार आहे. त्यामुळे विचार करू नका. चांगले दिवस येणार आहेत.

सिंह रास : आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागता येणार नाही. कुटुंबातील सर्वांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे तुम्हाला तुमचे मन राखता येणार नाही.

कन्या रास : आज विश्रांती घ्या. शरीराला पुरेशी विश्रांती गरजेची आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

तुळ रास : रात्रीचे जागरण टाळा. कामाचा व्याप वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील, स्वतःकडे लक्ष द्या आर्थिक स्थिती चांगली.

वृश्चिक रास : आज तुम्ही स्वतःसाठी जगाल. तुमचे दिसणे, कपडा लकता, याकडे लक्ष द्याल… फिरायला जायचा बेत आखाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील दिवस चांगला.

धनु रास : आज दिवस चांगला आहे. अनेक दिवस आरोग्याच्या ज्या तक्रारी जाणवत होत्या त्या दूर होतील. मन प्रफुल्लित होईल. बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल

मकर रास : जिभेवर आज साखर ठेवा. तुमचा प्रत्येक ठिकाणी सडेतोड बोलणारा स्वभाव आज जवळच्या माणसाला दुखवू शकतो. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.

कुंभ रास : आज लहान अपघात होण्याची शक्यता आहे. चालताना जपून चाला. गरोदर स्त्रियांनी अधिक काळजी घ्यावी. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन रास : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वातावरणातील बदलामुळे लहान मोठ्या कुरबुरी चालतील. डोक्यावर बर्फ ठेवा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!